टिक-टॉक कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत कोट्यावधींची मदत !

देशावर आलेल्या कोरोनारूपी संकटामुळे सामान्य माणसापासून ते इतर विशिष्ट माणसांपर्यंत सर्व हतबल झाले आहेत. देशावर आलेल्या या संकटावर मात करण्यासाठी लोकांना धीर देण्यासाठी काही मोठ्या संस्था, बॉलिवूड कलाकार आणि उद्योगपती पुढे येऊन जमेल तेवढे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आपले योगदान देत आहे.
विशेष म्हणजे आपण सर्वाना माहीत आहे की रतन टाटा यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत 1500 कोटी रुपयांची मदत केले होती, त्याचबरोबर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी देखील 25 कोटी आणि त्यानंतर मुंबई नगरपालिकेला 3 कोटींची मदत जाहीर केली होती. त्याचबरोबर अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील शक्य होईल तेवढी मदत केली आहे.
आता यात भर म्हणून कोरोना विरोधातील लढ्यात टीक-टॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) आपला सहभाग नोंदवला आहे. या कंपनीने कोरोनाविरुद्ध लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५ कोटींची मदत जमा करण्यात आली असून या मदतीसाठी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कंपनीचे आभार मानले आहेत.
टिक टॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी या संबंधी मुख्यमंत्री कार्यालयात पत्र पाठवून यांची माहिती दिली आहे. या पत्रात नमूद केल्यानुसार त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात टिक टॉक कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार असून समाजाप्रति आम्हला जाण आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेसाठी त्यांनी एक लाख मास्क उपलब्ध करुन देण्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.
कंपनीने टीक-टॉकचा वापर करणाऱ्यांपर्यंत यापूर्वीच कोरोनासंदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवत जनजागृतीही केली आहे. कोविड १९शी सुरु असणाऱ्या या युद्धात सहभागी होण्यासाठी टीक-टॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.
वैश्विक संकटाच्या या प्रंसंगी एक जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पावले उचलली आहेत.