जुही चावलाने अमीर खान ला कीस करण्यास दिला होता नकार, जुहीने सांगितले “अमीर मला खूप जोरात दाबून..”

जुही चावलाने अमीर खान ला कीस करण्यास दिला होता नकार, जुहीने सांगितले “अमीर मला खूप जोरात दाबून..”

अमीर खानने  1988 मध्ये आलेला चित्रपट कयामत से कयामत तक मधून मुख्य भूमिकेत बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरु केले होते. मन्सूर खान दिग्दर्शित हा चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचे सिद्ध झाले. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जूही चावलानेही याच चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. यानंतर जूही आणि आमिरने बर्‍याच चित्रपटात एकत्र काम केले. पण जुहीने आमिरला एका चित्रपटामध्ये कीस करण्यास चक्क नकार दिला. आज आम्ही त्या चित्रपटामध्ये झालेली घटना तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

जुही आणि आमिरने एकत्र अनेक चित्रपट केले आहेत:- इशक चित्रपटाच्या शू*टिंग दरम्यान जूहीने त्याच्याशी 6 वेळा भांडण केले होते असे आमिरने एका मुलाखतीत सांगितले होते. या दोघांमधील हा भांडण बराच काळ चालला. यामुळेच दोघांमध्ये संभाषणही बंद झाले. विशेष म्हणजे आमिर आणि जूही यांनी हम है राही प्यार के, तुम मेरे हो आणि दौलत की जंग सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

जुही आणि आमिर मध्ये नेमका काय सीन झाला होता:- वास्तविक आम्ही बॉलीवूडचा सर्वात मोठा खान सुपरस्टार आमिर खानबद्दल बोलत आहोत. 1997 मध्ये आलेल्या इश्क या चित्रपटात जूही आणि आमिर मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहि*ट ठरला. चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांसमवेत चित्रपटाच्या गाण्यांचेसुद्धा कौतुक झाले होते. या चित्रपटात जुही आणि आमिरसह अजय आणि काजोल मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटात आमिर आणि जूही यांच्यात एक किसिंग सीन चित्रित केला जाणार होता.

आधी जुहीने या दृश्यास सहमती दर्शविली. पण आमीरने या सीननुसार बदल केले होते. अमीरने सांगितले की तो जुहीच्या डोक्याला अचानक जोरात पकडून दाबून कीस करेल म्हणजे हा सीन जास्त वास्तववादी आणि आकर्षक होईल पण त्याच वेळी या बदलांमुळे जूहीला अस्वस्थ वाटू लागले. यामुळेच जूहीने आमिरला कीस घेण्यास नकार दिला. यानंतर सेटवरच जूही आणि आमिरमध्ये चांगलेच भांडण झाले होते.

पण अमीरने हे जुहीला त्रास देण्यासाठी मुद्दाम असा विनोद केला होता, त्याला सीन मध्ये काही बदल करायचा नव्हता पण जुहीला अमीर चा हा विनोद आवडला नाही आणि त्यांच्या दोघात यांमुळे चांगलेच भांडण झाले होते.

अभिनेता आमिर खान आणि जूही चावला यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि प्रेक्षकांना ही जोडी नेहमीच आवडली आहे पण त्यांच्या इश्क चित्रपटाच्या वेळी झालेल्या घटनेमुळे सर्व काही बिघडले. या चित्रपटाच्या शू*टिंगदरम्यान जुही आणि आमिर यांच्यात भांडण झाले इतकेच नव्हे दुसर्‍या दिवशीही शू*ट न केल्याने जुहीला आमिरवर खूप राग आला होता.

त्याचवेळी एका मुलाखतीदरम्यान जुही चावलाला तिच्याबद्दल आणि आमिरच्या भांडणाबद्दल विचारले असता ती म्हणाली की आमिर अशी एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे मी नेहमीच माझा मित्र म्हणून पहिले आहे. आमच्या दोघांचेही बंधन असे आहे की आम्ही अजून तरुण आहोत. आम्ही नेहमी छोट्या छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडत राहतो.

जेव्हा आम्ही या चित्रपटाचे शू*टिंग करीत होतो, तेव्हा आमिर आणि अजयने माझ्याशी एक विनोद केला ज्यामुळे मी खूप अस्वस्थ झाले आणि जवळजवळ रडायला लागले मी इतकी नाराज झाले होते की मी ठरवलं की दुसर्‍या दिवशी मी शू*टिंगला येणार नाही. दुसर्‍याच दिवशी जेव्हा जूही शूटसाठी पोहोचला नव्हती तेव्हा त्या दिवशी आमिर खान, अजय देवगन आणि चित्रपटाचे दिग्दर्शक तिच्या घरी पोहोचले जिथे आमिरनेही जूहीची माफी मागितली होती.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *