मोटिवेशनल आणि आध्यात्मिक स्पीकर जया किशोरी यांचे नाव आज खूप प्रसिद्ध आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी देशभरात बरेच नाव व आदर मिळवला आहे. जया किशोरी खासकरुन तरूणांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्या सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहेत. त्यांचे मार्गदर्शन आणि ज्ञान सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल होत असते.
जया किशोरीचे काही फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तुम्हीही त्यांचे बरेच फोटो पाहिले असतील. पण आज आम्ही तुम्हाला जया किशोरी यांच्या या प्रवासा बद्दल आपल्यास सांगत आहोत.
जया किशोरी यांचा जन्म राजस्थानमधील एका ब्राम्हण कुटुंबात झाला होता. त्याच्या सुरुवातीपासूनच त्याच्या घरात एक आध्यात्मिक वातावरण होते. या वातावरणामुळेचं जयाजी कृष्ण भक्तीत अगदी लीन होऊन जायचा. यांना नारायण सेवा संस्थानच्या मुलांसमवेत वेळ घालवणे फार आवडत होते. एवढेच नव्हे तर आपल्या कमाईचा मोठा भागही या आश्रमात ते दान करत होत्या.
जया किशोरी त्यांचा कुटुंबावर फारच प्रेम करत होत्या. इतकेच नाही तर त्यांना एका सामान्य मुलीप्रमाणेच लग्न करून आई होण्याचा निर्णयही घेतला होता. सहसा आध्यात्मिक प्रवक्ते अशा गोष्टींपासून दूर राहतात परंतु जया किशोरी यामध्ये सर्वात वेगळ्या आहेत.
जया किशोरी एक कथावाचक आणि भजन गायिका आहेत. ज्या त्यांच्या प्रेरक भाषण आणि भक्ती अल्बमसाठी देखील प्रसिद्ध आहेत. लोक त्यांना किशोरीजी म्हणून ओळखतात. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी झाला असावा असा विश्वास आहे. गुगल वर त्यांचे स्तोत्रे, विवाहित जीवन, पती इत्यादींसह त्यांच्या वयाबद्दल बरेच शोध घेतले जातात.
साध्वी जया किशोरी राजस्थानच्या रहिवासी आहेत. त्यांनी बिर्ला मध्ये माध्यमिक हायस्कूल ते इंटरमीडिएट पर्यंत शिक्षण घेतले. जया किशोरी बीकॉममध्ये पदवीधर आहे. जया किशोरी यांचा जन्म गौण ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. त्यांच्या वडिलांचे नाव शिवशंकर शर्मा, आईचे नाव सोनिया शर्मा आणि बहिणीचे नाव चेतना शर्मा आहे.
आम्हला मिळालेल्या माहितीनुसार जया किशोरीने अद्याप लग्न केलेले नाही. पण माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे की त्या अगदी एक सामान्य तरुणी सारख्या आहेत. त्या लग्नही करतील, पण यासाठी अजून वेळ आहे. जया किशोरी यांनी एका मुलाखतीत माध्यमांना सांगितले आहे की त्या अगदी सामान्य स्त्रीप्रमाणे आहेत. त्या पुढे लग्नही करतील आणि आपला संसार देखील चालवतील.
वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एकट्याने सुंदरकंद हे भजन गायले. जे लोकांना खूप आवडले होते. त्यांनी अनेक भक्ती अल्बमला आपला आवाज दिला आहे. जया किशोरी यांनी नानी बाई का मायरा, नरसी का भट हे भजन सादर केले आहे. त्यांना प्रारंभिक शिक्षण देणारे गुरु गोविंदराम मिश्र यांनी त्यांचे नाव राधा ठेवले. तसेच श्री कृष्णावर त्यांचे प्रेम पाहून त्यांना आशीर्वाद म्हणून किशोरी जी ही पदवी दिली.
असे म्हटले जाते की जया किशोरी दरवेळी आपल्या कमाईतील काही हिस्सा नारायण सेवा ट्रस्ट, उदयपूर, राजस्थान येथे दान म्हणून देतत. हे दान दिव्यांगांना मदत करते. नारायण सेवा गरीब मुलांसाठी शाळा आणि जेवणाचाही पुरवठा करत असते.
Add Comment