घसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….

घसा खवखऊ लागल्यास कोरोनाची भीती न ठेवता करा ‘हे’ घरगुती उपाय, झटपट मिळवा आराम….

पावसाळा असो किंवा इतर कोणताही ऋतू घसा खवखवण्याची समस्या नेहमीच उद्भवते. थंड पदार्थ किंवा अन्य काहीही तेलकट खाण्यात आल्यास घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. यंदा कोरोनाच्या माहामारीनं थैमान घातल्यामुळे लोक स्वतःच्या आरोग्याला जास्त जपतात. पण तरीही अनेक कारणांमुळे घसा खवखवणं, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते.

सर्दी, खोकला, घसा खवखवणं ही लक्षणं टॉन्सिल्सचीही असू शकतात. घश्यातील वेदनेसह, घास गिळायला त्रास होणं, तोंडाचा खालचा भाग दुखणं, श्वासांमधून दुर्गंधी येणं ही लक्षणं असतील तर टॉन्सिल्सची समस्या असू शकते. आज आम्ही तुम्हाला घसा खवखवल्यास कोणत्या घरगुती उपायांचा वापर करता येईल याबाबत सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरच्याघरी आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

आलं : दररोज आल्याचा चहा प्यायल्यानं घश्याच्या समस्या दूर होतात. आलं एक नैसर्गिक वेदनशामक आहे म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. सर्दी, खोकला कमी करण्यास देखील ते मदत करतं.

मध : मध शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. त्यात असलेले पोषक तत्व बॅक्टेरियांना नष्ट करतात. घश्यात होणारी खवखव दूर करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर केला जातो. त्यासाठी दालचिनी पावडर आणि मध मिसळून ३ वेळा सेवन करा. त्यामुळे टॉन्सिल्सची समस्या कमी होण्यास मदत होईल.

हळद : हळदीचे फायदे तुम्हाला माहीतच असतील, एंटी- बॅक्टेरिअल, एंटी-फंगल गुण हळदीत असतात. घसा खवखवण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही हळदीचा वापर करू शकता. त्यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात घालून उकळा. या पाण्याने सलग दोन- तीन दिवस गुळण्या करा. हा उपाय केल्यास तुमची समस्या लवकर दूर होईल.

गरम पाणी : घश्यात समस्या उद्भवण्याआधी पासूनच तुम्ही दिवसातून दोनवेळा गरम पाणी पिण्याची सवय ठेवाल तर निरोगी राहाल. अनेकदा घसा सुका पडल्याने गळ्यात इन्फेक्शन होतं. त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेलने आपला चेहरा झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्यानं घशाला झालेलं इन्फेक्शन कमी होतं. हा उपाय दिवसातून दोनवेळा करा.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *