वास्तू नियमांचे पालन केल्यास घरात सकारात्मकता कायम राहते वास्तुशास्त्रामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्याच्या टिप्स सांगण्यात आल्या आहेत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तु विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार किचनमध्ये वास्तू नियमांचे पालन केल्यास आरोग्य संबंधित लाभ होऊ शकतात.
किचनमध्ये पुरेसा प्रकाश आणि हवा येण्या-जाण्याची व्यवस्था असावी. किचनमध्ये सूर्यप्रकाश आल्यास विविध प्रकारचे वास्तुदोष दूर होऊ शकतात. हवा खेळती राहिल्यास वातावरण आरोग्यवर्धक राहते.
स्वयंपाकघर आग्नेय म्हणजे दक्षिण-पूर्व दिशेला बनवणे सर्वात उत्तम राहते. ही दिशा अग्नीशी संबंधित कार्य करण्यासाठी श्रेष्ठ राहते. या व्यतिरिक्त वायव्य कोपरा म्हणजे उत्तर-पश्चिम दिशाही किचनसाठी योग्य राहते.
किचनमध्ये आग आणि पाण्याचे स्रोत एकत्र असू नयेत. पाणी आणि गॅस दूर-दूर ठेवावेत. हे दोन्ही तत्व एकमेकांचे विरोधी आहेत. हे एकत्र ठेवल्यास वास्तुदोष वाढतात.
स्वयंपाक करण्याची ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, अन्यथा आरोग्यासाठी हे हानिकारक ठरते. स्वच्छता नसल्यास वास्तुदोषही वाढू शकतात. वास्तुदोषामुळे मानसिक तणावही वाढू शकतो.
रोज सकाळ-संध्याकाळ स्वयंपाक केल्यानंतर सर्वात पहिले देवाला नैवेद्य दाखवावा. असे केल्यास देवाच्या नैवेद्य स्वरूपात आपल्याला अन्न मिळते आणि यामुळे आपले विचार पवित्र होतात. नकारात्मक विचार दूर राहतात.
नेहमी प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा. दुःखी किंवा क्रोधामध्ये स्वयंपाक करू नये.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Add Comment