कलयुगातील श्रवणकुमार : आपले आई-वडिल आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ८ वर्षाचा ‘हा’ मुलगा चालवतोय इ-रिक्षा.

कलयुगातील श्रवणकुमार : आपले आई-वडिल आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी ८ वर्षाचा ‘हा’ मुलगा चालवतोय इ-रिक्षा.

Viral

या जगामध्ये आपल्या आईवडिलांचे स्थान सर्वोच्च आहे, हीच शिकवण आपल्याला आजवर मिळत आलेली आहे. सहाजिकच ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे ज्यांच्यामुळे आपल्याला या जगात येण्याची संधी मिळाली त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात सर्वोच्च असायलाच हवे.

कित्येक जन्म घेतले तरी आपल्या आई-वडिलांचे उपकार फेडता येत नाहीत, हेच त्रिवार सत्य आहे. त्यामुळे आई वडिलांची सेवा करणे यातच स्वर्ग आहे असे अनेक जण समजतात आणि तेच वास्तव आहे. आयुष्यभर आपले आई-वडील आपल्या मुलांच्या सुखासाठी झगडत असतात.

त्यांना उत्तम आयुष्य मिळावे त्यांचे जीवन सुखमय व्हावे यासाठी हवा तो संघर्ष करण्यासाठी आई-वडील तयार असतात. त्याच दृष्टीने अनेक आईवडिलांचे त्याग बलिदान आपण पाहिले आहेत. मात्र आपल्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी तत्पर असणे असणाऱ्या अनेकांनी मोठाले उदाहरण देखील प्रस्थापित केले आहे.

काही कारणास्तव जर आई वडील आपल्या मुलांचा संभाळ नाही करू शकले तर, त्यांच्या मुलांनी त्यांचा सांभाळ करणे हेच जीवनाचे सत्य आहे. हे सत्य समजायला अनेकांना अनेक वर्ष जातात; मात्र काहींना चिमुकल्या वयातच हे सत्य समजते. असेच काही हैदराबादचा अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याने दाखवून दिले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी चंद्रगिरीकडे जाणाऱ्या एका व्यक्तीने हायवेवर स्कूल ड्रेस घातलेल्या एका छोट्या मुलाला इ रिक्षा चालवताना पाहिले. तो छोटा मुलगा दोन लोकांना आपल्या ई रिक्षा मध्ये बसवून कुठेतरी घेऊन जात होता. हे बघून तो व्यक्ती हैराण झाला, त्याने रिक्षाला थांबवले आणि ती रिक्षा चालवणार या मुलाला विचारले.

या छोट्या आठ वर्षाच्या गोपालकृष्णाची कथा ऐकून सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. या उद्या आठ वर्षाच्या मुलाने आपल्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घेतली आहे. त्याचे आई-वडील दिव्यांग आहेत मात्र, त्याला तीन छोटे भाऊ बहीण आहेत. आणि त्यांच्या मधील गोपालकृष्ण सर्वात मोठा आहे. त्यामुळे तोच सर्व जबाबदारी घेऊन ही रिक्षा चालवत आहे.

याबद्दल बोलताना गोपालकृष्ण म्हणाला की, शाळेनंतर मी आपल्या आई-वडिलांना इ रिक्षा मध्ये घेऊन जातो. मोठा मुलगा होण्याच्या नात्याने कुटुंबाची जबाबदारी उचलणे हे माझे कर्तव्य आहे. छोट्या गोपाल कृष्णाचे अंध आई वडील चंद्रगिरी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाज्या आणि किराण्याचे सामान विकतात. त्याबद्दल गोपाल कृष्णा चे वडील बोलतात की, ‘मी आणि माझी पत्नी सुरुवातीपासूनच अंध आहोत.

आमचे तीन मुले आहेत आणि गोपालकृष्ण सर्वात मोठा आहे. अभ्यास झाल्यानंतर तो आम्हाला पैसे कमावण्यात मदत करतो. आम्ही जरी दिव्यांग असलो तरीही आमचे तीन ही मुले शारीरिक रूपाने देखील फिट आहेत. त्यांना उज्ज्वल आयुष्य देण्याची आमची इच्छा आहे. सरकार कडून आम्हाला पेन्शन वाढवून मिळावी, सध्या आम्हाला तीन हजार रुपये मिळतात.

त्यामध्ये जेमतेम खर्च पुरतो, जर सरकारने आमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला तरीही आम्ही आभारी होऊ. आमचा मुलगा आम्हाला चंद्रगिरी येथील वेगवेगळ्या भागात इ रिक्षा घेऊन जातो. तिथे जाऊन आम्ही भाज्या आणि किराण्याची इतर सामान विकतो. सुरुवातीला चंद्रगिरी रुग्णालयाजवळ आम्ही एक छोटासा ठेला लावून किराण्याचे सामान विकत होतो, मात्र को’रोनाकाळत ते देखील असंभव झाले.

त्यामुळे गोपाल कृष्ण ई रिक्षा चालवून आम्हाला मदत करत आहे.’ काही दिवसांपूर्वी पो’लिसां’नी त्याला पकडले होते. आणि इथून पुढे आता अठरा वर्षाचा होईपर्यंत रिक्षा चालवणार नाही हे वदवून घेतल्यानंतरच पोलिसांनी त्याला आणि बाकीचा किराणा माल सोडला. सरकारकडून मदत मिळाल्यास या कुटुंबांना दिलासा भेटेल हे नक्की.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *