५५ सेकंदाच्या ‘या’ व्हिडिओची लिलावात बोली लागली ५ कोटी, पण अस काय आहे ‘या’ व्हिडिओ मध्ये, तुम्हीच पहा..

५५ सेकंदाच्या ‘या’ व्हिडिओची लिलावात बोली लागली ५ कोटी, पण अस काय आहे ‘या’ व्हिडिओ मध्ये, तुम्हीच पहा..

भारतामध्ये टेलिफोन येण्याच्या आधी फार काही तांत्रिक प्रगती झाली नव्हती. टेलिफोन आल्यानंतर एकमेकांशी संवाद सुरू झाला. कालांतराने मोबाईल आले. त्यानंतर सर्वांच्या हातामध्ये मोबाईल दिसू लागले. त्यानंतर काळाची गरज ओळखून इंटरनेट देखील सुरू झाले. त्यानंतर अँड्रॉइड फोन देखील आले. अँड्रॉइड फोन आल्यामुळे लोकांना आता मोबाईलवर सर्व काही पाहता येते.

कुठल्याही बँकेत किंवा कोणालाही पैसे द्यायचे देण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज नाही. आपण घरी बसल्या बसल्या एखाद्याच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्याचप्रमाणे गरजा वाढल्या आणि तांत्रिक शोध देखील लागत गेले. त्यानंतर सोशल मीडिया देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला.

त्यानंतर युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यासारखी माध्यम देखील खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आज युट्युब वर अनेक जण लाखो रुपये कमवत असतात. युट्युबवर आपल्याला सर्व काही मिळत असते. युट्युबवर जर आपण एखादी माहिती शोधली ती व्यक्ती सहज उपलब्ध होते. त्यामुळे आता युट्युबचा आधार घेऊन अनेक जण वेगवेगळ्या रेसिपी बनवत असतात.

त्याचप्रमाणे इतर तांत्रिक गोष्टी देखील या माध्यमातून शिकत असतात. एखाद्याला शिक्षणाची आवड असेल तर या माध्यमातून तो शिक्षण देखील होऊ शकतो. त्याचप्रमाणे कुठे मीटरमध्ये प्रॉब्लेम असेल, कुठली वॉशिंग मशीन खराब झाली असेल किंवा एखाद्या ची गाडी खराब झाली असेल तरीदेखील युट्युब वर याबाबतचे व्हिडिओ हे मिळून जातात.

त्याचप्रमाणे यूट्यूबने अनेकांना श्रीमंत देखील केले आहे. अनेक लोक युट्युब वर आपले स्वतःचे चॅनल सुरू करून लाखो रुपये कमवत असतात. त्यामुळे युट्युब कडे आता रोजगाराचे साधन म्हणून देखील पाहायला जात आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये एक गमतीशीर माहिती देणार आहोत. ही माहिती गमतीशीर असली तरी एका व्यक्तीने 55 सेकंदाचा व्हिडिओ साठी तब्बल पाच कोटी रुपये कमावले आहेत.

ही घटना काही दिवसांपूर्वीच घडलेली आहे. वेबसाईट मेल या संकेतस्थळाने याबाबतची माहिती दिलेली आहे. एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांचा व्हिडिओ गंमत म्हणून युट्युब वर अपलोड केला आणि त्यानंतर त्याने युट्युब कडे पुन्हा काही जाऊन पाहिले नाही. मात्र कालांतराने त्यांनी पुन्हा युट्युब सुरू करून पाहिले असता त्या व्हिडिओला लाखो व्हियूज भेटल्याचे त्यांना दिसले.

त्यानंतर हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की, याला तब्बल पाच कोटी रुपयांची बोली देखील लावण्यात आली होती. या व्हिडिओमध्ये दिसणारे दोन मुले हॅरी आणि चार्ली हे भाऊ आहेत. आणि ते एकाच खुर्चीवर बसलेले आहेत. यातील चार्ली हा हॅरी याच्या बोटाला चावतो आणि ते बाळ रडू लागते असा हा व्हिडीओ होता. हा व्हिडीओ हावर्ड डेविस यांनी 2007 मध्ये अपलोड केला होता.

आता या व्हिडिओ मधील मोठ्या मुलाचे वय तब्बल पंधरा वर्षेझाले असून त्याची उंची देखील सहा फूट झालेली आहे. या व्हिडिओ बाबत बोलताना हावर्ड डेविस म्हणाले की, मी मुलांच्या आजी ला पाठवण्यासाठी व्हिडिओ चित्रित करत होतो. त्यावेळी चार्ली ने त्याच्या भावाच्या बोटाला चावल. त्यानंतर गंमत म्हणून हा व्हिडिओ मी युट्यूब वर अपलोड केला.

आणि त्यानंतर मी युट्यूब कडे जाऊन काही पाहिलेच नाही. आणि त्यानंतर मी काही महिन्यांनी युट्युब उघडून पाहिले असता या व्हिडिओला तब्बल 883 मिल्लियन व्ह्यूज मिळाले होते. त्यानंतर मी हे पाहून हबकूनच गेलो. त्यानंतर कालांतराने मला फोन येण्यास सुरुवात झाली आणि या युट्युब व्हिडीओ ला बोली लावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हा व्हिडीओ तब्बल पाच कोटी रुपयांची ला बोली लावून विकला गेला. आता आम्ही यूट्यूब च्या माध्यमातून लाखो रुपये महिन्याला कमवात असल्याचे हावर्ड यांनी सांगितले आहे. माझी मुले देखील युट्युब वर खूप ॲक्टिव्ह असतात, असेही तो म्हणाला. युट्युब वरून आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच आम्हाला यूट्यूब च्या माध्यमातूनच इतर क्षेत्रांमध्ये जाहिरात करण्याची संधी देखील मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *