आपल्याच मुलीच्या प्रेमात पडला होता हा ज्येष्ठ अभिनेता, 21 वर्षाच्या या अभिनेत्रीसोबत राहत होता लिव्ह-इन-मध्ये, नाव जाणून चकित व्हाल..

बॉलिवूड मधून अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या सारख्या समोर येत असतात. बर्याच वेळा चित्रपटांमध्ये काम करताना स्टार्स एकमेकांच्या प्रेमात पडतात. हे कलाकार एकमेकांचे वय पहात नाहीत किंवा लोकांच्या बोलण्याची अजिबात काळजी करीत नाहीत. असाच एक बॉलिवूड अभिनेता आहे जो आपल्या चक्क चित्रपटातील मुलीच्या प्रेमात पडला होता.
तसेच या 21 वर्षांच्या लहान अभिनेत्रीसह तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिला होता. ज्या अभिनेत्याबद्दल आपण बोलत आहोत ते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर होय. नाना पाटेकर यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण ते आपल्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या अनेक अभिनेत्रींशी असणाऱ्या अफेअरसाठी चर्चेत राहिले.
नाना पाटेकर आणि बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यातील नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण दोघांची प्रेमकथा पूर्ण होऊ शकली नाही. या दोघांनी अग्निसाक्षी या चित्रपटात एकत्र काम केले होते. एका चित्रपटात नाना पाटेकर वडील तर मनीषा त्यांची मुलगी बनली होती अशी भूमिका करत असताना देखील या वेळी त्यांच्यात जवळीक वाढली जी हळूहळू प्रेमामध्ये बदलली.
९० दशकाच्या सुरुवातीलाच हे प्रेमप्रकरण सुरु झाले होते. नाना पाटेकरांच्या अभिनयाबद्दल कोणीच प्रश्न उभारू शकत नाही. पण असे असले तरी त्यांच्याकडे हिरोला साजेसे लूक कधीच नव्हते. शिवाय एक रागीट माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. तर दुसरीकडे मनिषाचा विवेक मुशरन याच्याशी नुकताच ब्रेकअप झाला होता.
चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान ते एकमेकांना डेटही करु लागले. पण त्यांचे हे प्रेम मिडिया पासून काही लपून राहिले नाही. मनिषाचे शेजारी आणि सेटवरची काही माणसे नाना पाटेकर मनिषाला कधी भेटतात याच्या बद्दल बोलत असताना दिसायचे होते. अनेकदा नाना पाटेकर यांना मनिषाच्या घरुन पहाटेच्या वेळी निघतानाही पाहिले गेले होते.
त्यानंतर हे दोघे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या खामोशी चित्रपटात एकत्र आले. पण यावेळी मिडिया मधून दोघांनाही पडद्यामागील त्यांच्या प्रेमसं-बंधांबद्दलच अधिक प्रश्न विचारले जाऊ लागले. मनिषाने नंतर ही गोष्ट मान्यही केली की ती आणि नाना एकमेकांसोबत आहे. नंतर नाना यांनीही या गोष्टीचा स्विकार केला.
आम्ही तुम्हाला सांगतो की त्यावेळी नाना पाटेकर हे आधीच विवाहित होते, परंतु तरीही ते मनीषा कोईराला बघून तिच्या प्रेमात पडले. मनीषा कोईराला देखील नाना पाटेकर यांच्याशी लग्न करू इच्छित होती. पण नानाला आपली पत्नी नीलाकांतीशी घटस्फो-ट घ्यायचा नव्हता.
याच कारणास्तव मनीषा कोइराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. ही जोडी फार काळ टिकली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नाना आणि मनिषाचा स्वभाव. दोघांचेही अस्थिर स्वभाव त्यांच्या नात्यामध्ये दुरावाच आणत गेले. नंतर अनेक कार्यक्रमांमध्ये एकमेकांशी भांडतानाही त्यांना पाहिले गेले आहे.
थोड्या वेळाने दोघांचे मार्ग वेगळे झाले. यानंतर मनीषा कोइरालाने नेपाळी उद्योगपती सम्राट दहल बरोबर लग्न केले. मात्र, मनीषा कोइरालाचे हे लग्न फार काळ टिकले नाही आणि काही वर्षांत दोघांचा घटस्फो-ट झाला. मनीषा कोइराला नंतर नाना पाटेकर यांचे अभिनेत्री आयशा जुल्कासोबतही अफेअर चालू होते. मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही बर्याच दिवसांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.