आपला मुलगा आणि पतीमुळे ७० वर्षाच्या ‘या’ आजी चालवताय पंक्चरच दुकान !

आपला मुलगा आणि पतीमुळे ७० वर्षाच्या ‘या’ आजी चालवताय पंक्चरच दुकान !

‘इच्छा तेथे मार्ग’, असे आपण खूप वेळा वाचले आहे. बालपणीच आपल्या पुस्तकात आपल्याला ही म्हण शिकवली जाते.

कोणतीही गोष्ट करण्याची जिद्द जर आपल्या मध्ये असेल तर, ती पूर्ण करण्यापासून आपल्याला कोणीही अडवू शकत नाही हा त्याचा अर्थ होतो. आपण असे अनेक उदाहरण आपल्या आसपास खूप वेळा पाहिले आहेत. अगदी असामान्य परिस्थितीतून, अनेकांनी यशाचे शिखर गाठले आहेत. त्यांचे संपूर्ण आयुष्य एक मोठे उदाहरण प्रस्थापित करते.

प्रसंगी बघता यशाची परिभाषा ही प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. प्रत्येक वेळी यश म्हणजे भरघोस प्रसिद्धी आणि पैसा एवढेच नसते. तर अनेकांसाठी यश म्हणजे सर्वसामान्य जीवन जगणे हे देखील असू शकते. सध्या अशाच एका आजीबाईचे आयुष्य संपूर्ण सोशल मीडिया वरती चर्चेचा विषय बनला आहे. सांगली येथे राहणाऱ्या रत्नाआजींची संघर्षगाथा जरा वेगळीच आहे.

रत्‍नाबाई सध्या सत्तर वर्षाच्या आहेत. ज्या वयात नातवंडं सोबत खेळायचे आणि सूनाकडून, मुलांकडून सेवा करून आरामाची आयुष्य जगायचे, त्या वयात रत्‍नाबाई आपल्या संसाराचा गाडा समर्थपणे हाकत आहेत. अ’पंग मुलगा आणि पती यांच्यासाठी या उतारवयात सुद्धा चक्क पंक्चर काढून स्वतःच्या घराचा उदरनिर्वाह करत आहेत.

रत्‍नाबाई रामचंद्र जंगम या सत्तरीकडे झुकलेल्या आहेत. मात्र तरीही स्वाभिमानाने आपल्या स्वतःचा छोटासा व्यवसाय त्या करत आहेत. सांगलीच्या अवघ्या शंभर फुटी रोड वर जंगम पंचर दुकान आहे. सकाळी दहा वाजता हे दुकान चालू होते ते थेट रात्री आठ वाजता बंद होते. पंचर काढण्याच्या या व्यवसायात पुरुष मंडळीच आपण पाहतो मात्र, तुम्हाला सांगलीच्या या जंगम पंक्चर दुकानात रत्नाआजी हा व्यवसाय करत असताना बघायला भेटतील.

आपल्या पोटासाठी रत्नाआजी हा व्यवसाय सुरू केला. आज त्यावर त्यांच्या संसाराचा गाडा सुरू आहे या दुकानाच्या जीवावरच त्यांनी आपल्या तीन मुलींचे शिक्षण पूर्ण करून संसार उभारून दिला. रत्नाआज्जीच्या सर्वात मोठ्या मुलाचे नाव दीपक. त्यानेच हा पंक्चर व्यवसाय सुरू केला होता मात्र, ऐन तारुण्यात तो निघून गेला.

आणि त्यानंतर त्यांनी सुरू केलेल्या दुकानाचा कारभार सुरुवातीला त्यांचे पती रामचंद्र यांनी दुकान सांभाळण्यास सुरुवात केली. मात्र, शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने अनेक ग्राहक परत जाऊ लागले. त्यामुळे, घराचा खर्च संभाळणे कठीण होऊ लागले. या परिस्थितीमध्ये खचून न जाता रत्नाआजींनी स्वतःच व्यवसाय शिकला आणि आज समर्थपणे सांभाळत आहेत.

जवळपास वीस वर्ष आधीच त्यांनी पंचर काढण्याचं हळूहळू शिकून घेतलं आणि आपल्या मुलाने सुरू केलेला हा व्यवसाय संभाळला. या परिसरातील दुचाकी तीनचाकी आणि अनेक रिक्षाचालक रत्नाआजीं आपल्या मायेने जोडले. रत्नाआज्जीकडे हे लोक आपली गाडी पंचर दुरुस्तीसाठी घेऊन येतच असतात.

दिवसाकाठी तीनशे ते साडेतीनशे रुपये रत्नाआजींला मिळतात आणि त्यातूनच त्या आपल्या संसार चालवत आहेत. दोन मुलं आणि तीन मुली अशी एकूण पाच आपत्ती रत्ना जिल्हा आहेत त्यापैकी सर्वात मोठा मुलगा देवाघरी गेला आणि दुसरा अ’पंग. तीने मुलींची लग्न झाली आहेत आणि आपल्या घरी ते सुखी आहेत.

म्हणून सध्या रत्नाआजी आपल्या पती व अ’पंग मुलासोबत राहतात. शासनाकडून त्यांना एकच अपेक्षा आहे आपल्या अ’पंग मुलाला आधार कार्ड उपलब्ध होत नाहीये त्यामुळे शासनाच्या मिळणाऱ्या सवलती पासून तो सध्या वंचित आहे; म्हणून आपल्या मुलाला आधार कार्ड मिळावे व शासनाच्या सवलती त्यालाही मिळाव्यात. एवढी एकच अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. मात्र परिस्थितीशी तडजोड न करता संघर्ष करून समर्थपणे त्या जो व्यवसाय करत आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *