आईच्या गावात ! गरोदरपणात करिनाने घातले असे टाईट कपडे पाहून लोकांनी दिली अशी रियाक्शन, पहा फोटो..

आईच्या गावात ! गरोदरपणात करिनाने घातले असे टाईट कपडे पाहून लोकांनी दिली अशी रियाक्शन, पहा फोटो..

 अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांच्या घरी लवकरच आणखी एका चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

गेल्या माहिन्यात ती गर्भवती असल्याची माहिती सैफ व करीनाने मिळून दिली होती. करीना कपूर दुसऱ्यांदा आई होणार आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजे अभिनेत्री करीना कपूर सध्या प्रेग्नेंसी एन्जॉय करते आहे. करीनाच्या गरोदरपणाचा सध्या सहावा महिना चालू असून आता तिचे वाढलेले पोट दिसत आहे.

या दरम्यान घरी आराम करण्याऐवजी ती शु-टींग मध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वी ती आगामी चित्रपट लाल सिंग चड्ढाचे शू-टिंग पूर्ण करून मुंबईला परतली आहे.

मुंबईत आल्यानंतर तिने एका जाहिरातीचे शू-टिंगदेखील केली आहे. नुकतेच तिचे काही सध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत करीना कपूर खूप टाइट ड्रेसमध्ये दिसते आहे. यात तिचे बेबी बंप दिसत आहे. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लोदेखील पहायला मिळत आहे.

करीनाने नुकतेच मुलगा तैमूरसाठी घरी हॅलोविन पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी तैमूरचे मित्रदेखील उपस्थित होते. करीनाने या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये तैमूरने आपल्या चेहऱ्यावर लाल रंग लावला आहे आणि एक काळा ड्रेस परिधान केला आहे. तैमूरचे बरेच मित्र देखील हेलोविन लूकमध्ये दिसत आहेत.

करीनानेदेखील या पार्टीतील तिचे फोटो शेअर केले आहेत. यादरम्यान करीनाने जो ड्रेस परिधान केला आहे त्यात तिचचे गरोदरपणाचे पोट स्पष्ट दिसत आहे. करीनाने मात्र खूप अधिकच टाईट ड्रेस घातल्याचे दिसत होते जे अशा अवस्थेत तिने खरे तर टाळले पाहिजे.

तिच्या या ड्रेसची व्ही-शेप नेकलाइन होती. यावर करीनाने स्टेटमेंट इअररिंग्स मॅच केले होते. या इअररिंग्सचे रंग तिच्या ड्रेसशी मिळते जुळते होते.

करीनाने अतिशय कमी मेक अप केला होता. तिने आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना आयलाइनरने हायलाइट केले होते. तिने टाइट स्लीक बन अशी हेअर स्टाइल केली होती.

काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की अशी कोणती गोष्ट आहे जी दुसऱ्या प्रेग्नेंसीमध्ये करायची नाही.

करीनाने सांगितले की, तैमूरच्या वेळी जेव्हा मी गरोदर होते तेव्हा सगळे मला खूप काही खायला सांगत होते आणि त्यामुळे माझे वजन त्यावेळी २५ किलो वाढले होते.

ते आता मला पुन्हा करायचे नाही. मला हे-ल्दी आणि फिट रहायचे आहे आणि माझे वजन मला नियंत्रित ठेवायचे आहे. प्रेग्नेंन्सीच्या बातम्यांना घेऊन करिना सध्या बरीच चर्चेत आहे.

करिना आणि सैफ अली खानने काही महिन्यांपूर्वी याची अधिकृत घोषणा केली होती. करिना तिच्या गरोदरपणाच्या अवस्थेत पोज देतानेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सैफ अली खानला जेव्हा करिना कपूरच्या दुसऱ्या  प्रेग्नन्सीबद्दल कळले तेव्हा तिची प्रतिक्रिया काय होती याबद्दल करीनाने सांगितले आहे.

एका मुलाखती दरम्यान करिना कपूरने सांगितले ज्यावेळी सैफ अली खानला दुसऱ्या प्रेग्नेंन्सीबाबत सांगितले तेव्हा त्याने काही फिल्मी रि-अ‍ॅक्शन दिली नाही. तो अगदी स्थिर आणि शांत होता.

करीना म्हणाली दुर्दैवाने आमच्या घरात कुणीच फिल्मी नाही. सैफ शांत होता पण खुश होता. आम्ही या बातमीनंतर आता पूर्णपणे एन्जॉय करतो आहे तसेच आमच्या घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *