अल्पावधीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर अचानक गायब झालेल्या ‘या सात’ मराठी अभिनेत्री

अल्पावधीत प्रसिद्धी मिळाल्यानंतर अचानक गायब झालेल्या ‘या सात’ मराठी अभिनेत्री

यश जेवढे मिळवणे कठीण असते तेवढचं ते टिकवणे अधिक अवघड असते. हा क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो. यात सर्व क्षेत्र असतात. मराठी चित्रपटसृष्टी देखील यात काही मागे नाही. मराठी चित्रपटसृष्टीत आजवर अनेक अभिनेत्री आल्या आणि गेल्या. यातील काहींना यश मिळाले तर काहींना मिळाले नाही.

मात्र, अल्पावधीतच यश मिळाल्यानंतर काही जणींच्या पदरी निराशा पडली. त्यामुळे त्या पुन्हा तेच ते काम करत नाहीत. मराठीत देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळतो. मराठी चित्रपटसृष्टी, मालिकांमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत त्यांना अल्पावधीत यश मिळाले. मात्र, त्यानंतर त्या गायब झाल्या. त्यानंतर त्या पुन्हा कधीही दिसल्या नाहीत.

प्रेक्षकांना प्रश्न पडतो की, आता या अभिनेत्री काय करत आहेत. म्हणूनच आम्ही आपल्याला आता या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत..

७. केतकी थत्ते : ही अतिशय दर्जेदार अभिनेत्री आहे. साधारण मराठीमध्ये नवीन प्रयोग सुरू झाले होते. तसेच झी मराठी ही वाहिनी नव्याने सुरू झाली होती. त्यावेळी आलेल्या आभाळमाया मालिकेत या अभिनेत्रीने काम केले होते. त्यानंतर तिने काटकोन त्रिकोण या मालिकेत काम केले.

तसेच काही नाटकात देखील तिने काम केले. तसेच ती कथ्थक नृत्यांगना असल्याचे सांगण्यात येते. मात्र, अल्पावधीतच यश मिळाल्यानंतर तिने मालिका आणि चित्रपटांपासून दूर राहण्याचे ठरवलेले दिसते.

६ सारा श्रवण: ही देखील अतिशय आघाडीची अभिनेत्री आहे. झी मराठी या वाहिनीवर पिंजरा या मालिकेत तिने काम केले होते. त्यानंतर तिने लग्न केले. त्यानंतर ती आता मालिका आणि चित्रपटापासून दोन हात लांब आहे.

५. नेहा गद्रे : काही वर्षांपूर्वी मराठी मालिका आणि चित्रपट सृष्टीसाठी हा चेहरा अतिशय लोकप्रिय झाला होता. स्टार प्रवाह या वाहिनीवरील मन उधान वाऱ्याचे, मोकळा श्वास, अजूनही चांदरात आहे या मालिकांतून ती दिसली होती. त्यानंतर तिने काही मालिकांमध्ये काम केले. 2019 तिने आपला प्रियकर सोबत लग्न केले. त्यानंतर ती मालिकांपासून दूरच आहे.

४. रेश्मा नाईक : काही वर्षांपूर्वी झी मराठी या वाहिनीवर श्रीयुत गंगाधर टिपरे नावाची ही मालिका आली होती. आपल्या अभिनयाने दिलीप प्रभावळकर यांनी ही मालिका गाजवून सोडली होती. या मालिकेतील सर्वच पात्रे खूप गाजले होते.

यात शलाका नावाचे देखील एक पात्र होते. हे पात्र रेशमा हिने साकारले होते. त्यानंतर तिने एकही मालिका केली नाही. आता ती लग्न करून सुखी संसारात व्यस्त आहे.

३. कादंबरी कदम: ही देखील आघाडीची अभिनेत्री होती. काही नाटकात काम केल्यानंतर कादंबरीने अवघाची संसार, तुझ्या विना सख्या रे या मालिका केल्यानंतर तिने काही मालिका आणि नाटक केली. काही वर्षांपूर्वी तिने दिग्दर्शक अविनाश अरुण सोबत लग्न केले. तिला एक मुलगा आहे. सध्या ही मालिकांपासून दुरुच आहे.

२. पल्लवी सुभाष : मराठी चित्रपट सृष्टीतील हे आघाडीचे नाव आहे. काही वर्षापूर्वी ईटीवी मराठीवर चार दिवस सासूचे नावाची ही मालिका प्रचंड गाजली. मालिकेत रोहिणी हट्टंगडी यांनी अफलातून भूमिका केली होती. तसेच या मालिकेत पल्लवी सुभाष देखील दिसली होती. त्यानंतर तिने गुंतता हृदय हे या मालिकेतून काम केले. सध्या मालिकांतून दूर आहे.

१. नीलम शिर्के: नीलम हिचे नाव सर्वदूर परिचित आहे. नीलम शिर्के हिने वादळवाट, असंभव, राजा शिवछत्रपती यासारख्या मालिकांमधून काम केले आहे. त्यानंतर तिने काही नाटकं, चित्रपटातून देखील काम केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून ती या क्षेत्रापासून दूर आहे. तिने लग्न केले असून तिला एक मुलगी आहे आणि ती सध्या रत्नागिरी येथे राहत आहे.

jaymaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *